नमस्कार, मी तुमचा लाडका आबा... मी कुठेही गेलेलो नाही, मी तुमच्यातच आहे. मागील दोन-चार दिवसांपासून मी बघतोय, तुम्ही सतत माझी आठवण काढून रडत आहात. पण माझ्या सोन्यासारख्या माणसांच्या डोळ्यात पाणी आलं की माझा जीव कासावीस होतो. मी इथेच तुमच्या सोबत आहे, तुमच्या प्रत्येक सुखात आणि दुखात तुमची सावली बनून. आदर्श बाळा, आता माझ्या पश्चात तूच या घराचा कणा आहेस. आपली गाडी तुलाच पुढे न्यायची आहे. घराचं जे काही स्वप्न आपण पाहिलं होतं, ते आता तुला पूर्ण करायचं आहे. तू सर्वांची काळजी घेशील, याची मला खात्री आहे. दीप बाळा, तू सतत तुझ्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. त्याची सावली बनून राहा आणि माझी जी काही अपूर्ण स्वप्नं आहेत, ती तुम्ही दोघं मिळून पूर्ण करा. गुडडा बाई, तू मला जशी हक्काने आणि मायेने फोन करायचीस, इथे येण्यासाठी नेहमी तयार असायचीस, तसाच हक्क आता या तुझ्या दोन्ही भावांवर ठेव. त्यांना सतत फोन करत जा, तुझं तेच प्रेम आणि मायेची ऊब तुला या दोघांमध्ये नक्कीच मिळेल. त्यांच्यासाठी तू नेहमी खंबीर राहा. ज्योत्स्ना, मला माफ कर. संसाराचा हा गाडा मी अर्ध्यावर सोडून निघालोय. तुझ्यासाठी आणि मुलांसाठी खूप काही करायचं राहून गेलंय. पण आता तू रडू नकोस, स्वतःला सावर. आता तूच मुलांचा आधार आहेस. मुलांना आणि आई-बाबांना व्यवस्थित सांभाळ, त्यांना तुझा धीर हवा आहे. बाळू नाना, आता या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम तुमचं आहे. आई-बाबा, ज्योत्स्ना आणि मुले या सर्वांना तुम्हीच आधार द्या. आई आणि दादा, तुम्ही खचून जाऊ नका. मला माहितीये तुमचं दुःख मोठं आहे, पण स्वतःला सांभाळा. तुमच्या आशीर्वादानेच हे घर पुन्हा उभं राहील. आणि माझे लाडके डुगा, रायू आणि चिंटू... तुम्ही खूप शिका, मोठे व्हा आणि माझं नाव उज्ज्वल करा. तुम्हा सर्वांवर माझं खूप प्रेम आहे. रडू नका... मी कायम तुमच्या आसपास, तुमच्या आठवणीत आणि तुमच्या कर्मात जिवंत आहे.